दारुडयांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ही सोडले नाही; दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या

पंढरपूर  | प्रतिनिधी

राज्यभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंदिराच्या दर्शन मंडपात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पंढरपूर येथे  सात मजली दर्शन मंडप बनवण्यात आला आहे. पंढरपूरचे विठ्ठल हे कोटयावधी लोकांचे आराध्य आहे. या ठिकाणी दरराेज हजारो भाविक दर्शनासाठी ये जा करतात. यात जास्तीत जास्त वारकरी संप्रदायातील भाविकांचा समावेश असतो. असे असले तरी मंदिरासारख्या अत्यंत पवित्र ठिकाणी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने खळबळ उडाली असून, या निंदनीय प्रकारामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील गंभीर निष्काळजीपणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसाट यांनी केली असून, दर्शन मंडपातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

या संतापजनक घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, धार्मिक स्थळांचे पावित्र्य धोक्यात आल्याने जनमानसात मोठी नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मंदिराची पवित्रता राखण्यासाठी तातडीने कठोर आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता सर्वसामान्य भाविकांकडून केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!