चार जिल्हयांना पावसाचा यलो अलर्ट, बुलडाण्यात ही सरी कोसळणार

बुलढाणा,

प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार ४ मे पासून पुढील तीन दिवसांत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यासह चार जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून अनेक ठिकाणी ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला आहे. मात्र या उष्णतेदरम्यान वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा, अकोला, अमरावती व वाशीम या चार जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अधूनमधून पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या पावसामुळे तापमानात किंचित घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बुलढाणा परिसरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!