तपोवन येथे ३८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मारोती मंदिराच्या कळसाजवळ घडली घटना

धामणगाव बढे
तालुक्यातील तपोवन येथे एका ३८ वर्षीय तरुणाने मारोती मंदिराच्या कळसाजवळ दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. राजू गुलाबराव शिकारे (वय ३८, रा. तपोवन, ता. मोताळा, जि. बुलडाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपोवन येथील मारोती मंदिराच्या कळसाजवळ असलेल्या सभामंडपाच्या मोकळ्या जागेत बाहेर आलेल्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने राजू शिकारे याने गळफास घेतला. ही घटना ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मृतकाचे वडील गुलाबराव मांगो शिकारे (वय ६५, रा. तपोवन) यांनी तात्काळ पोलिसांना दिली. मिळालेल्या रिपोर्टवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २३/२०२६, कलम १९४ ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची नोंद सहाय्यक फौजदार सुरेश सोनवणे (ब.नं. १६८४) यांनी घेतली असून, प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद बाठे (ब.नं. १५४३) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.




