जिल्हाध्यक्ष राजेश वाईनदेशकर यांचे आवाहन : प्रत्येक कर्मचाऱ्याने हजर राहावे

शेगावात २३ ऑगस्टला जि.प. कर्मचारी युनियनची केंद्रीय सभा

शेगाव

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा आणि विशेष गौरव सोहळा रविवार, २३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता हॉटेल श्री गजानन इन येथे होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष ॲड. बाबूराव पुजरवाड राहणार आहेत. या केंद्रीय सभेला जिल्हयातील प्रत्येक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  संघटनेचे संस्थापक तथा कर्मचारी चळवळीचे आद्यप्रणेते कर्मचारी महर्षी म.वा. ओंकार यांनी संघटनेची पायाभरणी केली. त्यानंतर माजी राज्याध्यक्ष बलराम मगर यांनी संघटनेचे नेतृत्व करत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. माहूर येथे झालेल्या अधिवेशनात ॲड. बाबूराव पुजरवाड यांची राज्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली शेगावात प्रथमच ही केंद्रीय कार्यकारिणी सभा होत आहे. सभेदरम्यान संघटनेच्या कार्यासाठी प्रदीर्घ योगदान देणारे माजी राज्याध्यक्ष बलराम मगर यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच नवनिर्वाचित राज्याध्यक्ष ॲड. बाबूराव पुजरवाड यांचाही विशेष सत्कार केला जाणार आहे. केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शासनाकडे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा होणार आहे. यासोबतच संघटनेचा जमाखर्च तसेच आगामी काळातील आंदोलन आणि संघर्षाची दिशा याबाबतही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

केंद्रीय कार्यकारिणीची सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होत असल्याने तिच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी जिल्हा युनियनने स्वीकारली आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवून हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी मोठ्या संख्येने शेगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!