अकोली येथील व्यक्तीची गळफास लाऊन आत्महत्या
अकोली येथील व्यक्तीची गळफास लाऊन आत्महत्या
खामगाव |अकोली
येथील चाळीस वर्षीय व्यक्तीनेगळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एकनाथ बाबुराव आवारे वय ४० यांनी ३० जानेवारी रोजी घराच्या टीनपत्राच्या लोखंडी पाइपला रुमालाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा तपास पोलीस घेत आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी मृतक एकनाथ याची पत्नी अश्विनी आवारे हिने दिलेल्या तक्रारीवरून मर्ग दाखल केला आहे पुढील तपास पोहे का प्रवीण जाधव करीत आहे.



