भयंकर ! अचानक मुलगा कुत्रा सारखा भुंकू लागला

प्रतिनिधी | प्रयागराज
एका १७ वर्षीय तरुण मुलाला कुत्राने चावा घेतला. घटनेच्या चार महिन्यानंतर अचानक मुलगा, कुत्रा सारखा बसू लागला, खावू लागला व ओरडू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना उत्तर प्रदेश राज्यतील मिर्झापूर जिल्हयातील जोगीपुरवा गावात नुकतेच घडली.
मिळालेल्या माहितीनुसार जोगीपुरवा येथील रहिवासी भाईलाल यांचा १७ वर्षीय मुलगा करण हा काही महिन्यापूर्वी परिसरातील हरौवा या आपल्या आजोळी गेला होता. या ठिकाणी त्याला कुत्रयाने चावा घेतल्याने परिवारातील लोकांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या ठिकाणी त्याला रेबीज चे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दुसरे इंजेक्शन परिसरातील कछुआ या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले. त्यानंतर मात्र सदर युवकाने व परिवाराने रेबीजच्या इंजेक्शनकडे दुर्लक्ष केले. चार महिन्यानंतर अचानक मुलाच वर्तनात बदल झाला. तो सातत्याने कुत्रा सारखा भुंकू लागल्याने गावातील नागरिकांनी त्याला भुतबाधा झाल्याचे सांगत मंदिरात बांधून ठेवले. याची माहिती गावातील इतर सुशिक्षीतांना मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कछुआ प्राथमिक रुग्णालयात भर्ती केले. या ठिकाणी त्याची तपासणी करुन त्याला पुढील उपचारासाठी वाराणसी येथे रेफर करण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकिय अधीक्षक डॉ. सचिन किशोर यंानी सदर युवकानी रेबीज ची पुर्ण इंजेक्शन न घेतल्याने त्याच्यावर रेबीज चा प्रभाव असल्याचे सांगितले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!