मुंबईत खळबळ…! विधानभवनासह चार ठिकाणे बॅाम्बने उडवून देण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

प्रतिनिधी | मुंबई
विधिमंडळ बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा मेल आज सकाळी आल्याने विधिमंडळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ विधानसभा परिसरात सर्च अॅापरेशन सुरु केले आहे. ही घटना १२ मार्च रोजी सकाळी घडली.
आज पोलिसांनी विधानभवन परिसरात कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची तपासणी केल्यानंतर सोडले आहे. मात्र, या धमकीच्या मेलची राज्यभरात चर्चा होत आहे. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मेलमध्ये मुंबईतील आणखी चार ठिकाणी बॅाम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

रोहित पवारांची सखोल तपास करण्याची मागणी
तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. फक्त भिती दाखवण्यासाठी धमकी दिली की या मागे काही आहे हे तपासलं पाहिजे. एकीकडे फारूक अब्दूल्ला यांना मारण्याचा कट होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रात बॉम्बची धमकी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला पाहिजे, असंही रोहित पवारांनी सांगितले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!