दे.राजा येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपरीक्षा पडली पार

दे.राजा हायस्कूल येथे ६०० विद्यार्थी झाले सहभागी

प्रतिनिधी | बुलडाणा,
ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिन निमित्त जिल्हयातील दे.राजा येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सुमारे ६०० विद्यार्थी सहभागी झाले. ही परीक्षा दे.राजा हायस्कूल मैदानावर १० मार्च रोजी सकाळी पार पडली. या स्पर्धेचे आयोजन सत्यशोधक शिक्षक सभा व संविधान जागर अभियानाच्यावतिने करण्यात आले.
सत्यशोधक शिक्षक सभा , संविधान जागर अभियान व दे.राजा हायस्कूल दे.राजा यांच्या संयुक्त वतीने शिवजयंती निमित्त विविध ऊपक्रम नियमित राबवले जातत. दरम्यान संविधान जागर अभियानातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ” या सचित्रपुस्तकावर सदर ज्ञानपरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा पहिल्या टप्यात वर्ग ५ ते ७ साठी आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेची सुरुवात शाळेचे प्राचार्य आर.बी.कोल्हे ,उप प्राचार्य यू.एल.बंड, पर्यवेक्षक डी.व्ही.जाधव, पी.के राठोड यांच्या हस्ते शिवप्रतिमे चे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन संविधान जागरचे परीक्षा संयोजक दिपक रिंढे यांनी केले तर आभार डाॅ.श्याम मुडे यांनी मानले.
यावेळी पर्यवेक्षक म्हणून प्रा.इंद्रजित सोनपसारे, मोहन कंकाळ, संतोष बोरकर, निलेश सदावर्ते, विष्णू नाईक, मयूर झिने, हर्षल साळवे, खंदाकर मॅडम, निलेश सांगळे, तुषार गरकळ, एम.जी.झोरे, सतिष चित्ते, आकाश शिंगणे, सतिष मुळे, आदी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!