वाशिममध्ये धक्कादायक प्रकार; फिजिक्सच्या पेपरला ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखी

बारावीच्या परीक्षेत सीसीटीव्ही असतांनाही सामुहिक कॉपी

वाशिम

 सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातील परीक्षापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे एकसारखी आढळून आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे सामूहिक कॉपीचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित केंद्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

    राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी फिजिक्सचा पेपर होता. त्यात भरारी पथकाने वाशिम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (क्रमांक 0906), टो – जुमडाफाटा येथे धाड टाकली. त्यात परीक्षा सुरू असताना केंद्रावर सामूहिक कॉपी सुरू असल्याची बाब भरारी पथकाच्या निदर्शनास आली. यासंबंधीच्या माहितीनुसार, भरारी पथकाने 16 फेब्रुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास या परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्रावर केऊण 584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 581 विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्ष हजर होते. पथकाने त्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली, तव्हा अधिकारीही चक्रावून गेले. परीक्षेला उपस्थित असणाऱ्या सर्व 581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच होती. जणूकाही सर्व विद्यार्थ्यांनी एकाच स्त्रोतातून उत्तरपत्रिका कॉपी केली होती.

 शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उत्तरपत्रिका वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत,  कॉपीसंदर्भात पुरावे तपासले जात आहेत, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे या घटनेमुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, चौकशी अहवालानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे, केंद्राची मान्यता रद्द करणे किंवा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!