जानेवारीत ‘पीएमआय’ मध्ये सुधारणा

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवरून सावरत भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने पुन्हा एकदा प्रगतीचा टप्पा गाठला असून, नवसंजीवनी मिळवल्याचे संकेत दिले आहेत.

ताज्या प्रसिद्ध झालेल्या ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (PMI) नुसार, डिसेंबरमध्ये ५५ पर्यंत घसरलेला हा निर्देशांक जानेवारीत ५५.४ वर पोहोचला आहे. नवीन ऑर्डर्समध्ये झालेली वेगवान वाढ आणि प्रत्यक्ष उत्पादनातील सुधारणा ही या सकारात्मक बदलाची मुख्य कारणे मानली जात आहेत. एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी स्पष्ट केले की, बाजारपेठेतील मागणीचा उत्साह आणि तंत्रज्ञानातील वाढती गुंतवणूक यामुळे उत्पादनाला मोठी मदत झाली आहे. विशेष म्हणजे, या विक्रीला मुख्य चालना भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेतून मिळाली असून, आशिया, युरोप, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडील देशांतूनही नवीन निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या सकारात्मक वातावरणामुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचा वेग कायम ठेवला असून, गेल्या तीन महिन्यांतील हा रोजगाराचा सर्वाधिक वेगवान दर ठरला आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!