खाटूश्याम जाण्याऱ्या एक्सप्रेसला मलकापूरात थांबा

मलकापूर
राजस्थानमधील सुप्रसिध्द खाटूश्याम या तिर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांची बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने खाटूश्यामजी जाण्यासाठी आणखी एक विशेष रेल्वे गाडी सुरू केली असून त्या गाडीचा थांबा मलकापूर येथे सुध्दा मिळाला आहे. यापुर्वीसुध्दा विशेष रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. तर आता पुन्हा काकीनाडा – हिसार – काकीनाडा ही विशेषरेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाडी क्र. ०७७०५ ही १८ फेब्रुवारी ते २५ मार्च व ०७७०६ २२ फेब्रुवारी ते २९ मार्च अशी धावणार असून खाटूश्याम (रिंग्स जक्शन) कडे जाण्यासाठी मलकापूर रेल्वे स्थानकावर दर गुरूवारी सकाळी ७:३२ वाजता तर अकोला दिशेने जाण्यासाठी दर मंगळवारी सकाळी ६:१३ वाजता ही गाडी राहणार आहे. या सुविधेचा लाभ भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष अॅड. महेंद्र बुरड, तालुकाध्यक्ष पारसमल झाबक यांनी केले आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!