९२ वर्षीय आजीला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले

दोघे अटकेत, महिलेसह तिघे फरार

९२ वर्षीय आजीला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले
दोघे अटकेत, महिलेसह तिघे फरार
प्रतिनिधी | साखरखेर्डा
येथून जवळच असलेल्या मौजे हनवतखेड येथे ९२ वर्षीय वयोवृद्ध आजीला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून एका महिलेसह दोन आरोपी फरार आहेत. ही घटना नुकतेच घडली.
प्राप्त माहितीनुसार, हनवतखेड येथील रहिवासी वृध्द महिला सुमन श्रीराम चव्हाण वय ९२, या २९ जानेवारी रोजी घरी एकट्याच असताना अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घराच्या मागील किचनरूमचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. आजी झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली. नाकातील दागिना काढताना आजीला जाग आल्यावर चोरट्यांनी लेन कटर दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या आजीने “तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, पण मला मारू नका,” अशी विनवणी केली. त्यानंतर चोरट्यांनी दोन्ही हातातील सोन्याच्या पाच तोळयांच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची २ तोळयाची पोत, कानातील सोन्याचे एक तोळयाचे झुमके आदी दागीने पळवले. त्यांनतर चोरटयांनी घरातील ३२ इंची टीव्ही व रिसीव्हर घराबाहेर काढून ठेवले असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अनिल चव्हाण यांच्या तक्रारवरुन साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस तपासाची ठळक कामगिरी
तक्रार दाखल होताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी करण एकनाथ वंजारे रा. खेर्डा, ता. मालेगाव, जि. वाशीम व मनोज मोहन इंगळे रा. सुकंडा, ता. मालेगाव, जि. वाशीम यांच्यावर केंद्रित झाली. पोलिसांनी दोघांना अटक करून सर्व चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गुन्ह्यातील एका महिलेसह दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
000

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!