सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी | खामगाव
सुनेला घरात एकटी पाहून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी एका सासऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नांदुरा तालुक्यातील एका गावात नुकतेच घडली.
नांदुरा तालुक्यातील एका गावातील तरुणाशी १९ वर्षीय तरुणीचा विवाह झाला होता. विवाहानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच आरोपी सासरा शेख मेहबूब शेख लाल (रा. वडनेर भोलजी) याने सुनेला घरातील खोलीत एकटी पाहून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित विवाहितेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख मेहबूब शेख लाल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.



