बुलडाण्याला मिळाला पहिला तायक्वांदो राष्ट्रीय पंच

ऋषिकेश सुनील सोलंकी यांचे ऐतिहासिक यश

बुलडाण्याला मिळाला पहिला तायक्वांदो राष्ट्रीय पंच
ऋषिकेश सुनील सोलंकी यांचे ऐतिहासिक यश
प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढवणारी अभिमानास्पद कामगिरी करत ऋषिकेश सुनील सोलंकी यांनी राष्ट्रीयस्तरावर यश मिळवले आहे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल रेफरी सेमिनार–२०२६ अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे ते बुलडाणा जिल्ह्यातील पहिले तायक्वांदो राष्ट्रीय पंच ठरले आहेत.
हा नॅशनल रेफरी सेमिनार बीड जिल्ह्यात पार पडला. सदर सेमिनारचे आयोजन तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन, मुंबई यांच्या मान्यतेने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये क्योरुगी व पुमसे या दोन्ही प्रकारांमध्ये सखोल प्रशिक्षण देण्यात येऊन त्यानंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत यश मिळवत ऋषिकेश सोलंकी यांनी राष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून मानांकन प्राप्त केले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्यातील खेळाडू, पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.
या यशामुळे बुलडाणा जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाला नवी दिशा मिळणार असून, नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!