जिल्ह्यात ‘अरुणोदय’ सिकलसेल अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यापक जनजागृतीमुळे १ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण

जिल्ह्यात ‘अरुणोदय’ सिकलसेल अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यापक जनजागृतीमुळे १ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण

बुलडाणा,

 सिकलसेल मुक्त महाराष्ट्र या राज्य शासनाच्या उद्दिष्टाच्या दिशेने बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान” ला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिकलसेल आजाराचे निर्मूलन व जनुकीय दोष पुढील पिढीत जाऊ नयेत, यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले असून, या मोहिमेमुळे आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची सिकलसेल तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

या अभियानाची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये गावोगावी सभा व माहिती सत्रे, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने व प्रभातफेरी, घरोघरी जाऊन आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवकांमार्फत समुपदेशन, तसेच सोशल मीडिया, पोस्टर्स, बॅनर्स व माहितीपत्रकांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. आकाशवाणीवरील मुलाखती व सोशल मीडियावरील प्रचारामुळे नागरिकांमधील भीती दूर होऊन तपासणीसाठी लोकांचा कल वाढला आहे.

या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील ० ते ४० वर्षे वयोगटातील एकूण २ लाख २० हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख नागरिकांची सिकलसेल तपासणी पूर्ण झाली असून, तपासणीदरम्यान १४५ नवीन सिकलसेल कॅरिअर (वाहक) रुग्ण आढळून आले आहेत.

सिकलसेल आजार हा अनुवांशिक असल्याने तो पुढील पिढीत संक्रमित होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. शोधण्यात आलेल्या १४५ नवीन रुग्णांसाठी ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष विवाहपूर्व समुपदेशन (Pre-marital Counseling) सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमधून रुग्णांना भविष्यातील धोके, प्रतिबंधात्मक उपाय व आवश्यक काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

“सिकलसेल मुक्त जिल्हा घडविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी. उर्वरित नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!