अन्यथा महापालिकेचे आयुक्त थेट महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प

मनीष अग्रवाल | पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती गठित केली नाही, तर आयुक्तांकडून थेट महापौरांकडे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे त्या मुदतीपूर्वी स्थायी समितीची स्थापना करून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अर्थसंकल्पाचे काम सुरू असून, सर्व विभागांकडून प्रस्तावित कामे व खर्चाचे तपशील संकलित करण्यात आले आहेत. हे काम अंतिम टप्प्यात
आले आहे. नियमानुसार महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी दि. १ मार्चपूर्वी स्थायी समितीसमोर सादर करणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दि. २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती स्थापन होण्याची प्रतीक्षा केली जाणार आहे. मात्र, तोपर्यंत समिती अस्तित्वात आली नाही, तर आयुक्तांकडून थेट महापौरांकडे अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भाजपला दि. २८ फेब्रुवारीपूर्वी स्थायी समितीची स्थापना करणे अपरिहार्य ठरणार आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!