केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली महाराष्ट्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक

आरोग्य सेवा सहज आणि सुलभ बनविण्यासाठी उपाययोजना करा जाधव यांचे निर्देश

बुलडाणा : 

 गोरगरीब जनतेला केंद्रबिंदु मानुन प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातुन आरोग्य सेवा सहज, सुलभ आणि सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातुन कार्यप्रणाली अमंलात आणा अशा सुचना केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल्या आहेत.

                 आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक नागरीकांना दर्जेदार वैद्यकिय सुविधा पोहचविणे आयुष उपचार पध्दतीचा विस्तार करणे आणि आरोग्य सेवा मजबुत करण्यासंदर्भांत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये बोलतांना केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावेळी बोलतांना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टी नेतृत्वाखाली आम्ही “स्वस्थ्य भारत, सशक्त भारत” या संकल्पनेतुन निरोगी महाराष्ट्रासाठी आणि विकसीत भारतासाठी वास्तवात सहज आणि सुलभ आणि सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत. वैद्यकिय क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सुध्दा शासनाच्या विविध योजना तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंस्फुर्तीने काम करणे गरजेचे असल्याचे मतही केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत व्यक्त केले.

                 या बैठकी दरम्यान राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, क्षयरोग, किटकजन्य आजार, आयुष आरोग्य मंदिर, आयुष ग्राम यासारख्या योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव, श्री.निपुल विनायक, सचिव आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, डॉ.भारती बलकवडे, आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान, डॉ. नितीन अंबाळेकर, संचालक, आरोग्य सेवा, डॉ. रमण घुमराळेकर संचालक आयुष विभाग महाराष्ट्र राज्य व मंत्रालयीन उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!