समर्थ फार्मसीत जी – पॅट मार्गदर्शन व करिअर कार्यशाळा पडली पार

प्रतिनिधी | देऊळगाव राजा
येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व करिअर विकासासाठी नुकतेच जी – पॅट मार्गदर्शन व करिअर कार्यशाळा घेण्यात आली.याचा लाभ परिसरातील शेकडो विद्यार्थांनी घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा नंदा कायंदे, सचिव सतीश कायंदे तसेच सहसचिव व आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून, यामुळेच दरवर्षी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने जी – पॅट परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. या यशाबद्दल पालक वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी बी. फार्मसी अंतिम वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे यांच्या सूचनेनुसार व उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सचिन जाधव (फंडामेंटल फार्मसी) यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. यावेळी जी – पॅट परीक्षेची तयारी करताना विविध विषयांचा अभ्यास कसा करावा, नियोजनबद्ध अभ्यास पद्धती, विषयानुसार रणनीती तसेच परीक्षेतील यशासाठी आवश्यक टिप्स याबाबत सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जी – पॅट को-ऑर्डिनेटर डॉ. पवन नारखेडे, प्रा. सुजित आंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे यांनी सचिन जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवानंद डोंगरे व प्रा. अमोल गिरी यांनी केले, तर प्रा. तन्मय डोणगावकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास काकड, वैभव तळेकर, जनार्दनपुरी, शरद नागरे, अक्षय घुगे, अक्षय सानप, अजय टाले, अजय मुंडे तसेच प्रतीक गुप्ता यांनी विशेष मेहनत घेतली.




