ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा बनणार, रेल्वे-गाड्या धावतील

नवी दिल्ली,
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली देशातील पहिल्या रोड-कम-रेल बोगद्यासह फोर लेन एक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली. याची एकूण किंमत ₹18,662 कोटी असेल. हा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा अंडरवॉटर रोड-कम-रेल बोगदा प्रकल्प असेल, ज्यात एकाच बोगद्यात रस्ता आणि रेल्वे मार्ग असेल. ट्रेन आणि गाड्या एकाच वेळी धावतील. हा प्रकल्प इंजिनिअरिंग-प्रोक्युअरमेंट-कन्स्ट्रक्शन (EPC) मॉडेलवर विकसित केला जाईल. या प्रकल्पांतर्गत गोहपूर (NH-15) ते नुमालीगड (NH-715) दरम्यान 15.79 किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल. सध्या नुमालीगड आणि गोहपूर दरम्यान सुमारे 240 किमी अंतर कापायला 6 तास लागतात. या प्रकल्पामुळे कमी वेळ लागेल. सदर निर्णय शनिवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.



