अहमदाबाद-वडोदरा येथील 12 शाळांना बॉम्बची धमकी

अहमदाबाद/वडोदरा (वृत्तसंस्था):

गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील तब्बल 12 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकी मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शाळांची कसून तपासणी करण्यात आली.  सुरक्षेच्या कारणास्तव काही शाळांमधील विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, धमकीचा ई-मेल कोणी पाठविला याचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम विभागाकडून तपास सुरू असून, ही धमकी खोटी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही घटना 16 फेब्रुवारीच्या सकाळी घडली आहे.  दरम्यान  गुजरातच्या 12 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यात  वडोदराच्या 8 आणि अहमदाबादच्या 4 शाळांना बॉम्बची धमकी असलेला ईमेल मिळाला आहे.  या पार्श्वभूमिवर  शाळांमध्ये बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक शाळांवर पोहोचले आहे. सध्या शाळा रिकाम्या करून वाहनांमध्ये आणि शाळेच्या आवारात तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वडोदराच्या उर्मी शाळेची वसतिगृह देखील रिकामी करण्यात आली होती. इतर शाळांनाही धमकी मिळाल्याची शक्यता आहे.

या आहेत वडोदराच्या 8 शाळा

  • डी. आर. अमीन, वासणा रोड
  • उर्मी, समासावली
  • नालंदा, वाघोडिया रोड
  • बडोदा हायस्कूल, बगीखाना
  • नवयुग, समा
  • जीवन साधना, नाघरवाडा
  • AWS, डभोई
  • शानेन, खोडियारनगर

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!