बुलडाण्यात चार दिवस होणार शिवविचारांचा जागर; शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी

विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी | बुलडाणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलडाणा शहरात ‘शिवजन्मोत्सव २०२६’ निमित्त चार दिवस विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उत्सव समितीचे मार्गदर्शक आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
ते, स्थानिक विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही परिषद शनिवारी पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत उत्सव समितीचे अध्यक्ष गजेंद्र दांदडे, धाड नाका समितीचे अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, सचिव प्रा. सुनील सपकाळ, कोषाध्यक्ष उमेश शर्मा तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र काळे उपस्थित होते. राजेंद्र काळे यांनी गतवर्षी झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेत प्रसारमाध्यमांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी यंदाच्या शिवजन्मोत्सवाची सविस्तर रूपरेषा मांडली. यावेळी सचिव प्रा. सुनील सपकाळ यांनी १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ‘शिवनेरी’ जिजामाता प्रेक्षागृह व व्यापारी क्रीडा संकुल परिसरात बहुतांश कार्यक्रम पार पडले जाणार असल्याची माहिती सांगितली.
‘हा उत्सव केवळ जयंतीपुरता मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि शिवविचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे उत्सव समितीचे अध्यक्ष गजेंद्र दांदडे यांनी सांगितले. या चार दिवसीय शिवजन्मोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

१६ फेब्रुवारी
दरम्यान यावेळी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शाहिर देवानंद माळी व युवा शाहीर पृथ्वीराज माळी यांच्या ‘शाहिरी शिवगर्जना’ या कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होईल.

१७ फेब्रुवारी
मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता धाड नाका परिसरात रक्तदान शिबिर पार पाडले जाणार आहे. १० वाजता वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आईबाप समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. असून त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता ‘खाटू श्याम भजनसंध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी गायक अजय पाटीदार, सोनाली नागेश्वर व अमोल तिथलकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

१८ फेब्रुवारी
रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कलाकार उदय साटम व सहकारी संच उपस्थित राहणार आहे. यावेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित मराठी लोककलेचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता शिवज्योती प्रज्वलन, मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात शहरातील सहकार विद्यामंदिरा पासून केली जाणार आहे. रात्री १०.३० वाजता शहरातील जयस्तंभ चौक परिसरात लेझर शो चे आयोजन करण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारी
मध्यरात्री १२ वाजता मुख्य सोहळा पार पाडला जाणार आहे. यावेळी या सोहळयाची सुरुवात ५१ तोफांच्या सलामीने केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता शिवपहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शाहीर डी.आर. इंगळे व संच यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ८.३० वाजता शिवसोहळा हाेणार आहे.

000

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!