अंगणवाडी सेविकेला मारहाण; पाच जणांविरुद्ध अढेंरा पोलिसांत गुन्हा

अंगणवाडी सेविकेला मारहाण; पाच जणांविरुद्ध अढेंरा पोलिसांत गुन्हा
प्रतिनिधी | अढेंरा
अंगणवाडीत खेळणाऱ्या मुलाच्या सुरक्षेबाबत पालकांना सूचना केल्याचा राग मनात ठेवून अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शेळेगाव आटोळ येथे घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलता संजय बोर्डे (वय ३७, व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. शेळेगाव आटोळ) या सकाळी अंगणवाडी केंद्रात कामावर उपस्थित होत्या. त्यावेळी गावातील आशा प्रकाश बोडे हिचा लहान मुलगा इतरांसोबत अंगणवाडीतील घसरगुंडीवर खेळत होता. मुलाला दुखापत होऊ नये, यासाठी स्नेहलता बोर्डे यांनी त्याच्या आईला मुलाला सांभाळण्याबाबत सूचना केली. याचा राग आल्याने आशा बोडे, अश्विनी सुरडकर व शोभा बोर्डे या अंगणवाडीत आल्या आणि त्यांनी स्नेहलता बोर्डे यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या कपड्यांची ओढाताण केली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी स्नेहलता बोर्डे यांचे पती संजय उत्तम बोर्डे हे तेथे आले असता, संजय प्रकाश बोर्डे व प्रकाश सिताराम बोर्डे यांनी त्यांनाही ढकलाढकली करून शिवीगाळ केली. या प्रकारामुळे स्नेहलता बोडे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी स्नेहलता बोडे यांच्या तक्रारीवरुन आशा प्रकाश बोर्डे, अश्विनी सुरडकर, शोभा प्रकाश बोर्डे, संजय प्रकाश बोर्डेव प्रकाश सिताराम बोर्डे(सर्व रा. शेळेगाव आटोळ) यांच्याविरुद्ध अमडापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!