वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात; विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासा

प्रतिनिधी | बुलढाणा

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अंत्यत महत्वाचा असा वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डिपीआर अंतिम टप्प्यात आला आहे. यातील अप्परवर्धा धरणापर्यंतचा पहिल्या टप्प्याचा डिपीआर ३१ ऑगस्टपर्यंत पुर्ण होणार आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा नविन वर्षाच्या सुरूवातील टेंडर काढण्यात येतील. असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस  मोर्शीत बोलताना सांगितले. मोर्शी येथे राज्यातील चौथ्या मत्स विज्ञान महाविद्यालयाच्या भुमिपुजनासाठी ते आले असता बोलत होते.

कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. अनिल बोंडे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याचवेळी त्यांनी मत्स विज्ञान महाविद्यालयाबद्दल बोलताना सांगितले कि, मोर्शीत सुरू होणारे हे राज्यातील चौथे व विदर्भातील पहिले महाविद्यालय आहे. शासनाने मत्सव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मत्स व्यवसायाला निश्चितच चालना मिळणार आहे. अनेकांचा गैरसमज आहे कि, मासेमारी ही समुद्रातच मोठ्या प्रमाणात होते.

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार वरुड, मोर्शी मतदार संघातील शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर मदत मिळाली नाही, असे आमदार यावलकर यांनी सांगितले. मात्र आता ते फाईल आमच्याकडे पोहचले आहे. त्यामुळे लवकरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणविस म्हणाले, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प देशातील महत्वाकांक्षी योजना आहे. या प्रकल्पातंर्गत गोसेखुर्द धरणातील पाण्याची उचल करुन ते पाणी बुलडाणा जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पातून ५५० किलोमीटरची स्वतंत्र नदी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील तब्बल १० लाख एकर जमिन सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!