इराण – अमेरिका सीमेवर टाॅयलेट वार
इराणवर हल्ल्यासाठी गेलेल्या USS जेराल्ड फोर्डचे टॉयलेट चोक; अमेरिकेची सर्वात महागडी युद्धनौका निरुपयोगी?

प्रतिनिधी
इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेली अमेरिका व इराण दरम्यान अाता टाॅयलेट वार सुरु झाल्याची माहिती अाहे. इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेली सर्वात महागडी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड या मुळे अडचणीत सापडली आहे. या नाैकेवरील सर्वच शौचालये अाता जाम झाल्या आहे. यामुळे युद्धनौकेवर तैनात असलेले 4,500 हून अधिक सैनिक ‘टॉयलेट वॉर’चा सामना करत आहेत. फ्रेश होण्यासाठी 45 मिनिटांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे आणि दुरुस्तीवरून सैनिकांमध्ये वाद झाल्याच्याही बातम्या आहेत. सदर कृत इराण कडील हेरांनी केल्याचे ही बाेलले जात अाहे. त्यामुळे अाता सीमेवर टाॅयलेट वार रंगतेय की काय अशी विनाेदी चर्चा रंगली आहे.
यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सर्वात महागडे विमानवाहू जहाज आहे. त्याचे वजन सुमारे एक लाख टन आणि किंमत सुमारे 1.08 लाख कोटी रुपये आहे. 2009 मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले आणि 22 जुलै 2017 रोजी ट्रम्प यांच्या हस्ते ते अमेरिकन नौदलात सामील करण्यात आले. ते अणुऊर्जेवर चालते. यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड जून 2025 पासून समुद्रात आहे. त्यापूर्वी ते कॅरिबियन समुद्रात होते. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून त्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अपहरण केले, तेव्हा या ऑपरेशनमध्ये त्याचा वापर करण्यात आला होता. त्यासोबत 3 गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहेत. 19 फेब्रुवारी रोजी हे स्ट्राइक ग्रुप स्पेन आणि मोरोक्कोदरम्यान जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये होते. 22 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत ते इस्रायलजवळ पोहोचले होते. इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विमानवाहू जहाज मध्यपूर्वेत तैनात करण्यात आले आहे. म्हणजेच, आतापर्यंत हे विमानवाहू जहाज सुमारे 8 महिन्यांपासून समुद्रात आहे आणि पुढे सुमारे 6 महिने ते समुद्रातच राहू शकते.
सतत समुद्रात असल्यामुळे त्याची देखभाल होऊ शकत नाही. जेराल्ड फोर्डवर 650 शौचालये 10 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलेली आहेत. या शौचालयांमधून कचरा काढण्यासाठी VCHT म्हणजेच व्हॅक्यूम कलेक्शन, होल्डिंग अँड ट्रान्सफर सिस्टीम बसवण्यात आली आहे. VCHT व्हॅक्यूम सिस्टीम निकामी झाल्यामुळे त्याची शौचालये चोक झाली आहेत.
परिणामी अाता नाैकेवरील सैनिकात हल्ला करणया येवजी टाॅयलेट मधे फ्रेश होण्यासाठी 45 मिनिटांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत आहे आणि या वरून सैनिकांमध्ये वाद हाेत अाहे. त्यामुळे अाता इराण नाैकेवर देखील अशीच हालत तयार हाेतील यासाठी अमेरिकेकडून देखील हालचाली सुरु करणयात अाल्याची चचा असल्याने सीमेवर अाता टाॅयलेट वार रंगते की काय असे वातावरण तयार हाेत अाहे.




