सावधान, सायबर चोरटा आता आलाय मित्राच्या भुमिकेत; बुलडाण्यात खळबळ

हॅल्लो मित्रा, तुझा खात्यात २५ हजार आले आहे, मॅसेज बघ, म्हणत ऑनलाईन लाखोची चोरी

प्रतिनिधी | बुलडाणा
“हॅलो मित्रा, तुझा खात्यात २५ हजार आले आहेत, मॅसेज बघ!” असा फोन करुन सांगत सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्गाचा वापर करत आहे. मोबाईलवर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या या संदेशामागे फसवणुकीचा सापळा लपलेला असून, लिंकवर क्लिक करताच बँक खात्यातील रक्कम चोरली जात आहे. असा प्रकार शहरात सर्रास होतो आहे. अशा फोन पासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. दिवसेन दिवस सायबर चोरटे अधिक आधूनिक होत चालले आहे. रोज नवीन नवीन शक्कल लढवत नागरिकांचा पैसा चोरत आहे. आधी बँक अधिकारी, कंपनी प्रतिनिधी किंवा लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. आता अनोळखी व्यक्ती मोबाइल नंबरच्या मालकाचे नाव माहित करुन समोरुन फोन करतो आहे, नाव घेत अरे मित्रा तुझा खात्यावर माझी रक्कम आली आहे, फोन चालुच राहू दे, मॅसेज बघ, असे सांगतो आहे. मोबाइल धारकांने चुकून मोबाइल चालु असतांनाच सदर आलेला मॅसेज उघडून बघीतला तर त्याच्या खात्यातील सर्वच रक्कम परस्पर चोरीला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. मागील आठवडया पासून सदर प्रकार बुलडाण्यात अनेकांनी अनुभवला आहे. या चोरटयांनी आता पर्यत लाखो रुपये लुटयाची माहिती आहे.

 

पैसे लाटण्यासाठी अत्याधूनिक टेक्नीकचा वापर
पूर्वी सायबर चोरटे मॅसेज पाठवत होते. सदर मॅसेज वर क्लीक करताच किंवा पैशांची खात्री करण्यासाठी लिंकवर क्लिक करत. सदर लिंक होताच लिंकद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा वायरस इन्स्टॉल होऊन बँकिंग अॅप, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जात होती. किंवा सायबर चोरटे एक लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगित. लिंक उघडल्यावर बँक तपशील, ओटीपी किंवा यूपीआय पिन विचाररुन घेत. ही माहिती मिळताच गुन्हेगार काही मिनिटांतच खात्यातील पैसे काढून घेत होते. परंतू आता चोरटे देखील अत्याधिक हायटेक झाले आहे. त्यांनी अशाच हायटेक टेक्नीकचा वापर करने सुरु केले आहे. त्यामुळे आता केवळ पैशाचा मॅसेज आला तो बघा असे सांगत आहे. विशेष म्हणजे मोबाइल सुरु असतांनाच सदर मॅसेज बघण्याची सख्ती त्यांच्याकडून केली जात आहे. मोबाइल चालू असतांना सदर मॅसेज उघडला तर आपल्या खात्यातील सर्वच रक्कम लाटण्याचा प्रकार या ठिकाणी सुरु आहे.

अद्यात एक ही तक्रार नाही
मागील काही दिवसापासून जिल्हयात या पध्दतीने अनेकांना फोन आले आहे. काहीना गंडवल्या गेले आहे, तर जास्तीत जास्त मंडळी ही अशा प्रकारचे फोन येताच सर्तक होत आहे. विशेष म्हणजे फोनवर बोलणारी समाेरची व्यक्ती ही हिंदी भाषेतून संभाषण साधते. या संदर्भात सायबर विभागाकडे एक ही तक्रार नोंदवली नसल्याची माहिती मिळाली आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी कॉल वरुन पैशाची देवान घेवानचा विषय करु नये, कोणीही पाठवलेली लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी किंवा बँक तपशील कुणालाही सांगू नये आणि संशयास्पद संदेश आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवावी.
संग्राम पाटील
सायबर शाखा प्रमुख बुलडाणा जिल्हा

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!