उमरखेडला १०० कोटीचा निधी मिळणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची माहिती

उमरखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे लवकर मार्गी लागणार

प्रतिनिधी | मुंबई
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. भविष्यातील वाहतुकीचा विचार करून नवीन कामे लवकरच केली जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिले.
आमदार किसन वानखेडे यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आणि रुंदीकरणाच्या निकडीबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी विभागाची भूमिका स्पष्ट केली. उमरखेड मतदार संघाच्या विकाससासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. सद्यस्थितीत ५१३ आणि ५१D ही कामे प्रगतीपथावर आहेत. मोठ्या शहरांमध्ये किंवा गावांलगत १० मीटर धावपट्टी आणि दोन्ही बाजूंना ३ मीटर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. सध्या सुरू असलेल्या कामात तांत्रिक बदल केल्यास भूसंपादनासारख्या अडचणींमुळे प्रकल्पास विलंब होऊ शकतो. त्यामुळे, या रस्त्याचे पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करण्यासाठी स्वतंत्र नवीन काम हाती घेण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. यासाठी प्राथमिक अंदाजानुसार कामासाठी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!