टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या – गोपीचंद पडळकर

मुंबई,

टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला आहात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याचा काही विषयच नाही. ज्याने हजारो हिंदूंची हत्या केली आहे त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करत आहात इतके नीच राजकारण सुरू आहे.मताच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालले आहात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तु्म्ही इतक्या नीच लोकांची तुलना करतात परत त्यावर आंदोलने करतात हे शोभनीय नाही. आता निवडणूक होऊन गेली 2029 मध्ये निवडणूक आहे, आता असे वक्तव्य का करत आहात? असा सवाल पडळकरांनी केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!