अखेर वृक्ष कत्तलीला राष्ट्रीय हरित लवाद यांनी दिला स्थगितीचा निर्णय; असीम सरोदे यांच्या लढाला मिळाले यश!

प्रतिनिधी | बुलडाणा,
नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी लाखो वृक्षांच्या कत्तलीकरुन या वृक्षांच्या रक्तांनी माखणाऱ्या जमिनीवर साधूग्राम उभारण्याचा मानस शासनाकडून अमलात आणला जात होता. याला विरोध करत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी शासनाला खरमरीत पत्र देवून ही प्रक्रिया तत्काळ थांबवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला राष्ट्रीय हरित लवाद यांनी गांभीर्याने घेत सदर निर्णयाला तत्काळ स्थगिती दिली आहे. या निर्णयाने असीम सरोदे यांच्या लढाला यश मिळाल्याने पर्यावरणप्रेमी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे येथील कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून साधूग्राम साठी लाखो वृक्षांची कत्तल करण्यात येवू नये, ही आपली संस्कृती नाही, तसेच महाकुंभमेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण अथवा राजकारण्याशी स्पर्धा करण्यात येवू नये अशी स्पष्ट मागणी केली होती. यापूर्वी ही लवादच्यावतीने कोणतेही कायदेशिर प्रक्रिया पुर्ण न करता झाडे कापण्यात येवू नये असा आदेश ही दिला होता. मात्र बेकायदेशिर प्रक्रिया दाखवून या ठिकाणी मोठया प्रमाणात करवती चालवल्या जात होत्या. परंतू आता यावेळी पुढील तारखे पर्यत कोणत्याही वृक्षाची कटाई करण्यात येवू नये असे आदेश देण्यात आले आहे.

आपण पर्यावरण संदर्भात संवेदनशील असलो पाहिजे
निसर्गासोबत जगण्याची मानसांची परंपरा आहे. ही प्रत्येक धर्मात ही आहे. आपण निसर्गाचा अपमान करुन उत्सव साजरा करत असू तर निसर्ग आपणाला कधीच माफ करणार नाही.
असीम सरोदे, कायदे तज्ज्ञ पुणे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!