अशोक खरातच्या सेक्स रॅकेटात रुपाली चाकणकर मुख्य सूत्रधार
रुपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी | मुंबई
मुंबईत गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ॲड रुपाली ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत रुपाली चाकणकर हे अशोक खराताच्या सेक्स रॅकेटात रुपाली चाकणकर या मुख्य सूत्रधार असल्पायाचा आरोप केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ठोंबरे म्हणाल्या की, अशोक खरातशी संबंधित असलेल्या या रॅकेटमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असू शकतो आणि यामागे प्रभावशाली लोकांचे जाळे कार्यरत असल्याचा संशय आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर मुख्य आरोपीशी संगणमत साधून हे सर्व करत होत्या. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस यंत्रणेकडून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे.




