महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर बंद

मनीष अग्रवाल : पुणे

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात मंदिर नित्यदर्शनासाठी खुले राहणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या कालावधीत भीमाशंकर येथे दररोज सुमारे एक लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची कामे सध्या सुरू आहेत. जुना सभामंडप पूर्णपणे उतरवण्यात आल्याने आणि नवीन सभामंडपाचे तसेच पायरी मार्गाचे काम प्रगतिपथावर असल्याने, मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असताना मंदिर खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. शिवाय, भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी महाशिवरात्री कालावधीत मंदिर खुले ठेवण्याचा विचार होता; मात्र सर्व बाबींचा विचार करून त्या निर्णयात बदल करण्यात आला असून, भाविकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत महाशिवरात्रीदरम्यानही मंदिर बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!