विद्यार्थी लोकशाहीतून जीवनमूल्यांची रुजवण : डॉ. प्रिती तायडे

बुलडाणा

शालेय जीवनात विद्यार्थी लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण होते. तसेच लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रिती तायडे (बाहेकर) यांनी केले.
त्या भारत विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान मार्गदर्शन करत होत्या. सदर कार्यक्रम ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५४ पासून शाळेत विद्यार्थी लोकशाहीचा उपक्रम राबविला जात आहे. या प्रक्रियेतून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले जाते. वर्षभर विविध खात्यांची जबाबदारी विद्यार्थ्यांकडून सांभाळली जाते. विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेण्यात आली. या प्रक्रियेसाठी संगणक शिक्षक विजय मोरे यांनी तांत्रिक सहकार्य केले. निर्वाचन आयुक्त नेहा पोपळघट यांनी निवडणुकीचा अहवाल सादर केला, तर उपनिर्वाचन आयुक्त म्हणून सारा कच्छी यांनी त्यांना सहकार्य केले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत वर्ग १० ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. दरम्यान मुख्याध्यापक तथा विद्यार्थी राज्याचे राष्ट्रपती प्रल्हाद गायकवाड यांनी उपस्थितांना माहिती देतांना सांगितले की, या उपक्रमामुळे नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, निर्णयक्षमता व आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते, यामुळे शाळेतील हा उपक्रम महत्वाचा ठरतो. यावेळी ‘साधना का पथ कठिन है’ हे गीत गौरी देशपांडे यांनी सादर केले. यावेळी दिपाली पाटील यांच्या हस्ते डॉ. प्रिती राहुल बाहेकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच विद्यार्थी लोकशाहीची संकल्पना शिक्षक डॉ. शिवशंकर गोरे यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय मनोज बैरागी यांनी करून दिला. राष्ट्रपती प्रल्हाद गायकवाड यांच्या हस्ते सभासद, मुख्यमंत्री, विविध मंत्री व सभापती यांना पदाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन वेदिका गवळी व श्रेया राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षदा झिने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग १० ‘ड’चे विद्यार्थी तसेच वर्गशिक्षक दिनेश गर्गे व संकेत आकाळ यांनी परिश्रम घेतले. शपथविधी सोहळ्यास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!