श्रीच्या’प्रगटदिन उत्साहाला महारूद्रस्वाहाकार यागाने सुरुवात.

श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व भजनी दिंडयांचे आगमन, 

१४८ व्या प्रगटदिन महोत्सव
प्रतिनिधी | शेगाव
चला हो शेगावी जाऊ जिवाचा जिवलगा पाहू…
श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी  सुध्दा श्रींचा प्रगट दिन उत्सव .२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाच्या पुजन करुन या श्रींच्या प्रगटदिन उत्साहाला सुरुवात झाली भक्तांनी श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केली होते.
श्री संत गजानन महाराज मदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे सकाळी ५ ते ६ काकडा ,७.१५  ते ९ .१५ भजन ,दुपारी ४ ते ५ प्रवचन ,सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे दि.२ फेब्रुवारी ह.भ.प. रामबुवा डोंगरे जाटनांदुर यांचे तर आज दि ३ फेब्रुवारी ह.भ.प. मनोज बुवा कुलकर्णी पिंप्राळा यांचे कीर्तन झाले. दि ४ फेब्रुवारी ह.भ.प. अनिरुध्द बुवा क्षिरसागर सावरगांव] .५ फेब्रुवारी  ह.भ.प. बळीराम बुवा दौंड शिवर, ६ फेब्रुवारी  ह.भ.प. संभाजी बुवा मेहुणकर धाराशिव दि.७ फेब्रुवारी  ह.भ.प. मयुर बुवा बोडखे, श्री क्षेत्र देहु दि.८ फेब्रुवारी ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव जालना व ८ फेब्रुवारी ह.भ.प.श्रीराम बुवा ठाकूर लातूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर  दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ मिती माघ वद्य ७ रविवार ला श्री ह.भ.प. भरत बुवा पाटील, मु. म्हैसवाडी यांचे सकाळी १० ते १२ “शेगांवी श्रींच्या प्रागट्टया” निमित्य कीर्तन होईल.
— यागाचे पुजन वेदमुर्ती ब्राम्हणवृंदाद्वारे—
दि.२ फेब्रुवारी वार सोमवार  रोजी श्री महारूद्रस्वाहाकार यागाचे पुजन बींड जिल्ह्यातील वेदमूर्ती ब्राह्मणवृंदाद्वारे यागाचे पुजन करण्यात आले आहे श्रीच्या मदिरात व सर्व परिसरात केळीच्या खाबाचे खुट व आंबाच्या पानाचे तोरणे लावली आहे. तर दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री  महारूद्रस्वाहाकार यागाची पुर्णाहूती,अवभृतस्नान होईल दुपारी ४ वाजता उत्सवांची पालखी अश्व,रथ, मेणासह परिक्रमा करीता निघेल. दि.९ फेब्रुवारी २०२६ मिती माघ वद्य ८ सोमवार ला श्री ह.भ.प. रविंद्र बुवा हरणे, मु. श्री क्षेत्र मुक्ताईनगर यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल. या प्रगटदिन उत्सावाची सांगता होणार आहे श्री प्रगटदिन उत्सावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्येप्रदेश,या ठिकाणाहून भजनीदिडया दाखल होत आहे.
— भजनी दिंड्यांचे आगमन–
श्रींच्या प्रगटदिन उत्सवानिमित्त सहभागी होणाऱ्या भजनी दिंड्यांच्या ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया गजानना अवलिया अवतरले जग ताराय या नामघोषाने संत नगरी भक्तीमय झाले आहे श्रींच्या प्रगट दिन उत्सवाच्या सप्ताहामध्ये सात दिवस राज्यातील हजारो भाविक श्रीच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन धन्य होणार आहे.
— विद्युत रोषणाई—
श्री संस्थान मघ्ये प्रगटदिनाच्या निमित्ताने श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसरात पिवळा रंगाची विधुत रोषणाई व तर प्रवेशद्वार यावर रंगीबेरंगी आकर्षक अशी विधुत रोषणाई करण्यात आली आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!