अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सागर पनाड यांची नियुक्ती !

लोणार

पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले सागर वामनराव पनाड यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या राष्ट्रीय समितीच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली .

ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे तसेच ग्रामीण पत्रकारितेला अधिक बळकटी देण्यासाठी सागर पनाड यांची निवड करण्यात आल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने , रा. कार्याध्यक्ष युसुफ खान , राज्याध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख , सरचिटनिस राजेंद्र भूरे व राष्ट्रीय समीती च्या वतीने ही नियुक्ति करण्यात आली असुन
नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की , सागर पनाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, राजकीय तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने वृत्तांकन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीनंतर पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच मित्रपरिवाराकडून सागर पनाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा (पश्चिम) जिल्ह्यात ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सागर पनाड यांनी नियुक्तीबद्दल राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानत, ग्रामीण पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या मूल्यांच्या जपणुकीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!