फत्तेपूर-धामणगाव बढे मार्गावर भीषण अपघात, चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन तरुण गंभीर

सादिक बिस्मिल्लाह शेख
फत्तेपूरहू कडून धामणगाव बढे कडे येत असताना एका दुचाकी व चारचाकी वाहानाची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 30 जुलैच्या संध्याकाळी सुमारे 7.30 ते 8 च्या सुमारास घडला.
अपघाताची माहिती मिळताच भाजप जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे आणि मंगेश श्रीसागर यांनी तात्काळ 108 ॲम्ब्युलन्ससह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिन्ही जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे हलवले. गोपाल भगवान शेलेकर (वय २७) गोलू आनंदा जाधव (वय २६) व
सागर बाळु श्रीसागर (वय २२) अशी जखमी युवकांची नावे आहे. हे तिन्ही जखमी धामणगाव बढे येथील रहिवासी आहेत. वेळेवर 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे त्यांना तात्काळ बुलढाणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. फत्तेपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




