आठ दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या मागातून सापडली आंतरजिल्हा महिला टोळी

प्रतिनिधी | सिंदखेड राजा
आठ दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या मागावरुन पोलिसांनी आंतरजिल्हा महिला टोळीस पकडले. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
प्रवासा दरम्यान बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या आंतर जिल्हा महिला टोळी जिल्हयात सक्रिय हाेती. काही दिवसापूर्वी देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसने प्रवास करणाऱ्या फेमिनाबी नूर मोहम्मद यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने असलेले पाकीट लंपास केले होते. सदर पाकीटात सोन्याचे १९० मणी असलेली पोत आणि १७ नग पुतळ्या असलेली पोत, असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी चोरीला गेला होता. या फेमिनाबी नूर मोहम्मद यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड, पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे आणि पोलीस अंमलदार मनोज खरडे यांनी तातडीने समातंतर तपास सुरु केला. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा परिसरातून चार संशयित महिलांना ताब्यात घेतले. फिर्यादीने उपरोक्त महिलांना ओळखल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांची नावे नंदिनी सुरी गड्डी वय २२ वर्षे, पार्वती राकेश गड्डी वय २० वर्षे, कस्तुरी राम गड्डी वय २० वर्षे रा. सोलापूर तर लक्ष्मी व्यंकटेश मच्छा वय २५ वर्षे रा. माजलगाव असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!