धोक्याची घंटा! दाभ्यात जीर्ण विद्युत खांब कोसळला

लोणार

दाभा गावातील मुख्य रस्त्यावरील अशोक डव्हळे यांच्या घराजवळील जीर्ण झालेला लोखंडी विद्युत खांब अचानक उखडून रस्त्यावर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी किंवा नागरिक नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती.

ज्या ठिकाणी हा खांब कोसळला, त्या मार्गावर दिवसभर शाळकरी मुले, नागरिक आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करून संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, कोसळलेल्या खांबाच्या तळाचा भाग पूर्णपणे गंजून कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा अपघात घडला आहे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक लोखंडी विद्युत खांब अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून, त्यांची वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे दाभा गावातील सर्व जीर्ण विद्युत खांबांची तातडीने पाहणी करून धोकादायक खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!