युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून मोहेगाव येथील शाळकरी विद्यार्थ्यांना एस.टी. बसची सुविधा
एसटी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन

बुलढाणा
मोहेगाव येथील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज बुलढाण्यात शिक्षणासाठी ये-जा करताना भेडसावणारा एसटी बससेवेचा प्रश्न गंभीर बनला असता विद्यार्थांनी युवानेते मृत्युंजय गायकवाड यांची भेट घेवून सदर अडचण सांगितली. यावर त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी अधिका्ऱ्यांनी या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सोमवारी विद्यार्थ्यांनी बुलढाणा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जाऊन आपल्या प्रवासाच्या अडचणी मांडल्या. आमदार संजुभाऊ गायकवाड दौऱ्यावर असल्याने विद्यार्थ्यांनी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी नियमित बस उपलब्ध नसल्याने शाळेत वेळेत पोहोचणे कठीण होत असून त्याचा शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मृत्युंजय गायकवाड यांनी एसटी आगार व्यवस्थापक पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तातडीने बससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर आगार व्यवस्थापकांनी या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे मोहेगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून शिक्षणातील अडथळे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जीवन उबरहंडे, श्रीकृष्ण शिंदे, प्रदीप जैन, ज्ञानेश्वर खांडवे तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.




