प्रा. लहाने उद्याचे बी टी देशमुख ठरतील…. खा.अरविंद सावंत
शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यास शिक्षकांचा भरगच्च प्रतिसाद

बुलडाणा
विधान परिषद अमरावती शिक्षक मतदार संघासाठी शिवसेनेचा संकल्प मेळावा आज अमरावती येथे पार पडला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिक्षकांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. प्रा.डी एस लहाने अभ्यासू ,समाजशील व्यक्तिमत्व आहे, ते उद्याचे बीटी देशमुख ठरतील असा विश्वास शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी आ.नितीन देशमुख, आ सिद्धार्थ खरात,उपनेते सुनील सूर्यवंशी ,राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, शिवसेना नेते नरु खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदींची उपस्थिती लाभली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील प्रा. डी एस लहाने यांना शिवसेनेची उमेदवारी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर आज अमरावती येथे शिक्षक सेना व शिवसैनिकांनी त्यांच्या विजयाचा संकल्प केला. मेळाव्यासाठी अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्या शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, शिक्षक आमदार म्हटले की आपल्या डोळ्यापुढे बी टी देशमुख यांचे नाव येते.सखोल अभ्यास आणि समाजशील व्यक्तिमत्व म्हणून बीटी देशमुख यांचा राज्याला परिचय होता. शिक्षकांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी सलग शिक्षक आमदार म्हणून त्यांच्या समस्या सभागृहात मांडण्याचे काम केले. तसेच व्यक्तिमत्व मला प्रा. लहाने यांच्यामध्ये दिसत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लहाने सर कार्यरत आहे.त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली.त्यांच्या हाती भगवा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. आज पाचही जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व शिक्षक सेना प्रा. लहाने यांच्यासाठी विजयश्री खेचण्याचे काम करतील असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.
आ.नितीन देशमुख, आ सिद्धार्थ खरात,उपनेते सुनील सूर्यवंशी ,राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, शिवसेना नेते नरुभाऊ खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदींनी यावेळी विचार मांडले.




