काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार : गजानन घोंगडे

आंदोलनानंतर स्मशानभूमी-गोरणाळ रस्त्याच्या कामाला गती

धामणगाव बढे 

धामणगाव बढे येथील स्मशानभूमी ते गोरणाळ या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे यांनी केलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. २८ सप्टेंबर रोजी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले असले, तरी कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

रस्त्याच्या कामाची गती मंदावल्याची माहिती मिळताच गजानन घोंगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. नागरिकांच्या दीर्घकाळच्या अडचणी लक्षात घेता कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

“जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला सोडणार नाही,” असा स्पष्ट इशारा घोंगडे यांनी दिला. आंदोलनानंतर काम सुरू झाले असले तरी केवळ सुरुवात करून चालणार नाही, तर निर्धारित वेळेत काम पूर्ण होणे आणि ते दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गरज भासल्यास नागरिकांच्या प्रश्नासाठी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.

दरम्यान, प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाला काही प्रमाणात गती देण्यात आली असून सध्या प्रत्यक्ष काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गजानन घोंगडे यांनी समर्थकांसह घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत माहितीही घेतली.

स्मशानभूमी ते गोरणाळ हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्त्याचे काम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आंदोलनानंतर कामाला सुरुवात झाली असली, तरी काम पूर्ण होईपर्यंत त्यावर आपले लक्ष राहणार असल्याचे घोंगडे यांनी स्पष्ट केले.

 

काम सुरू झाले, आता पूर्णत्वाची प्रतीक्षा

आंदोलनामुळे रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाच्या पातळीवर गती मिळाली आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काम पूर्ण होईपर्यंत प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि वेग यावर लक्ष ठेवण्याची भूमिका घोंगडे यांनी घेतली आहे.

 

आंदोलनाचा परिणाम; प्रशासनाकडून हालचाली

आमरण उपोषणामुळे स्मशानभूमी-गोरणाळ रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला. उपोषण मागे घेतल्यानंतर कामाला सुरुवात झाली असून, त्यानंतर पुन्हा कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आंदोलनानंतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!