सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी – शहराध्यक्ष तौफिक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी

लोणार शहर कार्यकारिणीत विविध समाजांना प्रतिनिधित्व; पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर

लोणार

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक करण्यासाठी शहराध्यक्ष तौफिक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध समाजघटकांना कार्यकारिणीत योग्य प्रतिनिधित्व देत सर्वांना सोबत घेऊन पक्षाची वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्याकडून रीतसर परवानगी घेत कार्यकारिणीच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
शहरातील प्रत्येक समाजघटकाचा सहभाग वाढवून पक्षाची संघटनात्मक ताकद भक्कम करण्यासोबतच नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे कुरेशी यांनी सांगितले. सर्व समाजांचे प्रतिनिधित्व असलेली कार्यकारिणी ही पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंबादास खंड पाटील, नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, पंचायत समिती लोणारचे माजी सभापती भगवान सानप, संजय अंभोरे, अभिजीत सानप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी आहे लोणार शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी
उपाध्यक्ष : समाधान लिंबाजी मापारी (पाटील), किरण पद्मचंद बोरा, रवी रामभाऊ खोट, भारत हरिश्चंद्र राठोड, कैलास मारोती जगदाळे.
सरचिटणीस : रऊफ खान नूर खान, संदीप सुखदेव दांडगे, परमेश्वर प्रकाश सुरजुसे, शिवाजी राजाराम चोपडे, संजू शंकर धनेकर.
सचिव : संजय वामन अंभोरे.
सहसचिव : सचिन दिलीप बाजड.
कोषाध्यक्ष : शेख रशीद शेख हमजा कुरेशी.
सदस्य : चंदू कन्हैयालाल सोनीग्रा, साजिद रहमान अली काझी, मोहसीन खान लतीफ खान, सुनील देवीदास नेवरे, शेख रशीद शेख बुढन कुरेशी, सचिन कचरू सुरजुसे, शेख असमत शेख अमीर कुरेशी, रहमत नूरा परसुवाले, मुज्जम्मील शेख बिबन कुरेशी, दीपक मारोती मोरे, मकसूद गुलाम कुरेशी, प्रकाश नारायण जाधव.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!