मार्च एंडीग ला फक्त ५२ दिवस , खनिज उत्खननाच्या वसुलीचे वीस कोटी थकीत

थकीत महसूल व गौण खनिज दंड वसुलीसाठी आता दंडात्मक कारवाईची पावले, मालमत्ता होणार  आता जप्त

प्रतिनिधी | बुलडाणा
मार्च एंडींगला अवघा ५२ दिवसांचा कालावधी राहिला आहे, त्यात सुटीचे पंधरा दिवस व होळी वगैर सण विचारात घेता अवघा महिनाच महसुल वसुलीला राहला आहे.मात्र वसुली फक्त ६७.७३ टक्केच राहिले आहे. त्यातच गौण खनिज वसुली २० कोटी रुपयांची थकीत आहे , जमीन महसुलचेही २४ कोटी बाकी आहे. त्यामुळे ही बाब हेरुन थकीत १०० टक्के वसुलीचे सक्ती आदेश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले असून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशच एका बैठकीत दिले आहेत. विशेषतः गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, अशा प्रकरणात प्रलंबित असलेले सर्व दंड त्वरित वसूल करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल विभागाची या बाबत एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदींनुसार थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीसारखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांना गावोगावी भेटी देऊन थेट वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रलंबित कर आणि गौण खनिज अवैध उपशाचा दंड भरण्यासाठी वारंवार मुदत देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कठोर पावले उचलण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
— गाव पातळीवर घेण्यात येणार आहे आता आढावा —
नागरिकांनी प्रशासकीय कारवाई आणि दंडात्मक बोजा टाळण्यासाठी आपला थकीत जमीन महसूल, कर आणि गौण खनिजाचा दंड त्वरित जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. ही मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली असून, गाव पातळीवर दररोज वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. शासकीय महसूल आणि गौण खनिजावरील दंड हा विकासकामांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व स्तरावर ही वसुली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!