क्रीडा विभागाची शॅडो आर्टच्या माध्यमातून स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली

क्रीडा विभागाची शॅडो आर्टच्या माध्यमातून स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली
प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित अधिकारी कर्मचारी यांच्या सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्या दिवशी रात्री सहभागी कलावंतांनी शॅडो ॲक्टच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प बुलडाणा यांच्या कर्मचारी कलावंत संचाच्या वतीने हे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री असताना स्व. अजित पवार यांनी राज्यात अमलबजावणी केलेल्या विविध यशस्वी योजनांचे प्रासंगिक या शॅडो एक्ट च्या माध्यमातून करण्यात आले. तसेच विमान अपघाताच्या दुर्दैवी व दुःखद घटनेचा प्रसंग सुद्धा अतिशय संवेदनशीलतेने या कलावंतांनी उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभा केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले प्रकल्प अधिकारी, संदीप गवळी  व डॉ. राधा बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली सिद्धार्थ हिवाळे यांच्या संकल्पनेतून हा शॅडो एक्ट सादर करण्यात आला. यामध्ये सुनीता चित्ते, आशा खरे, लता तायडे, शालिनी मोरे (धाड), माया मोरे (तराडखेड), वैशाली गवई (भादोला), कुसुम हिवाळे (भादोला), रुपाली वानखेडे (डोंगर खंडाळा) या मुख्य कलावंतांसह बाल कलाकार स्वराज बर्डे यांनी अभिनय केला.
त्यांच्या या भावनात्मक सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांचे डोळे सुद्धा पाणावले होते.
—-

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!