ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींची आत्महत्या

गाझियाबाद :

ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहि‍णींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या धक्कादायक घटनेत तिघींचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरात ही घटना घडली आहे.
रच्यांनी तिघींच्या सतत ऑनलाईन गेम खेळण्यावर आक्षेप घेतला. यामुळे निराश झालेल्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी टोकाचा निर्णय घेतला. मृत मुलींचे वय अनुक्रमे बारा, चौदा आणि सोळा होते.

टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुली टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरातल्या भारत सिटीमध्ये वास्तव्यास होत्या. मुलींनी एकदम टोक गाठल्याचे बघून पोलीस पण चक्रावले आहेत. या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. मुलींनी टोकाचा निर्णय घेण्यामागे फक्त ऑनलाईन गेम खेळण्यावर घेतलेला आक्षेप एवढेच कारण आहे की अन्य काही बाब आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जाईल आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

मुलींनी बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी नेमके काय घडले याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुली ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचा कोरियन लव्हर हा गेम खेळत होत्या.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तिघी बहिणी बाल्कनीत आल्या. आधी एकीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही मृत्यू झाला. तिघीजणी नवव्या मजल्यावरुन एकदम खाली जमिनीवर कोसळल्या. काय घडले आहे याची जाणीव होताच प्रत्यक्षदर्शीने मदत मागवली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. मुलींनी उडी मारण्याआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत वडिलांची माफी मागत एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. डायरीत सर्व सत्य कथन केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.

मुलींच्या वडिलांनी दोन वेळा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून बराच काळ मूल झाले नाही म्हणून तिच्याच सख्ख्या बहिणीशी त्यांनी लग्न केले होते. यामुळे कौटुंबिक पातळीवर नेमके काय घडले याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!