नोटांनी भरलेलं विमान कोसळल, घटनास्थळी पैसे लुटण्यासाठी मोठा गोंधळ

जारोस्लाव लुकीव्ह,
बोलिव्हियामध्ये शुक्रवारी (27 फेब्रुवारी) संध्याकाळी एक विमान अपघात झाला. हवाई दलाचे एक मालवाहू विमान उतरताना धावपट्टीवरून घसरले आणि थेट विमानतळाबाहेरील रस्त्यावर असलेल्या वाहनांना जाऊन धडकले. या विमानात माेठया प्रमाणात नाेटा भरलेल्या हाेत्या. सदर नाेटा र(त्यावर पडताच नागरिकांनी लुटणयासाठी माेठा गाेंधळ केला.
हे विमान सरकारी ‘सेंट्रल बँक ऑफ बोलिव्हिया’साठी नोटांचा मोठा साठा घेऊन जात होते. सांता क्रूझ शहरातून निघालेले हे C-130 Hercules विमान शुक्रवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ‘एल अल्टो’ विमानतळावर उतरत होते. वेळी विमानाचा वेग प्रचंड असल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीची सीमा ओलांडून बाहेर आले. विमानाची धडक इतकी भीषण होती की, बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं. काही वाहने तर विमानाखाली अक्षरशः चेपली गेली.
विमान कोसळल्यानंतर त्यातील नोटांची पाकिटे फाटली आणि चलनी नोटा खाली पडल्या. ही बातमी पसरताच स्थानिक लोकांनी नोटा गोळा करण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!