पाकिस्तानमधील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजादरम्यान स्फोट

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान शिया मशिदीत आत्मघातकी हल्ला झाला.  या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आणि १६९ जण जखमी झाले. पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत कार्य सुरू केले आहे. रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले आहे आणि जखमींना तेथे हलविण्यात येत आहे. इस्लामाबादच्या पोलिस प्रमुखांनी शहरात आणीबाणी जाहीर केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे. यापूर्वीही 11 नोव्हेंबर 2025 रोजी इस्लामाबादमधील G-11 परिसरात जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!