हर्षित राणा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडणार

मुंबई :

अष्टपैलू हर्षित राणा टी-20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, हर्षित अजून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही, पण त्याची स्थिती चांगली दिसत नाहीये. संघाला संध्याकाळपर्यंत त्याच्या तंदुरुस्तीबद्दल अंतिम माहिती मिळेल. भारत आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. डिफेंडिंग चॅम्पियन भारत आपला पहिला सामना शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर USA विरुद्ध खेळेल.

दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी

वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो कदाचित संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमारने सांगितले की, फिजिओ त्याच्या दुखापतीची तपासणी करत आहेत. त्याच्या सावरण्याची शक्यता कमी आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!