जिल्हास्तरीय शिक्षकांची बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पडली पार

बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

प्रतिनिधी | बुलडाणा
येथील बुलडाणा एज्युकेशन सोसायटी, बुलडाणा यांच्या वतीने स्व. बाळासाहेब कविमंडन स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांची बुद्धिबळ स्पर्धा स्व. या. मा. काळे सभागृह, एडेड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा येथे उत्साहात पार पडली. ही स्पर्धा नुकतेच घेण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रामप्रसाद यादव होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. तुषार महाजन, विशेष अतिथी श्रीमती मिनल कविमंडन, संस्थेचे सचिव ॲड. रामानंद कविमंडन, संचालक ॲड. आनंद चेकेटकर, टी. सी. उबरहंडे, सदस्य ॲड. राघव कविमंडन तसेच मुख्याध्यापक किंबहुने आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या पार पडल्या. शिक्षक, महिला शिक्षिका व शिक्षकेतर अशा विविध गटांत स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विजेत्या शिक्षकांचा गौरव
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विविध गटांतील शिक्षकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. शिक्षक गटातून दीपक खडसन यांनी प्रथम, रघुनंदन देशपांडे यांनी द्वितीय, तर विष्णू राजगुरू यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला शिक्षिका गटात शुभांगी देशमुख यांनी प्रथम, तर जयश्री मानतकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. शिक्षकेतर गटात किरण पाटील यांनी प्रथम, तर विश्वजीत लव्हाळे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!