शेगाव क्लासिक २०२६ मध्ये प्रकटला विदर्भातील शरीरसौष्ठवपटूंच्या ताकदीचा, आविष्कार

शेगाव क्लासिक २०२६ मध्ये प्रकटला विदर्भातील शरीरसौष्ठवपटूंच्या ताकदीचा, आविष्कार
प्रतिनिधी | शेगाव
संतनगरी शेगाव येथे पार पडलेल्या शेगाव क्लासिक २०२६ या विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत विदर्भातील खेळाडूंच्या ताकदीचा, शिस्त व सौष्ठवकलेचा अविष्कार प्रकटल्या दिसून आले. हा कार्यक्रम नुकतेच स्व. गजाननदादा पाटील कॉटन मार्केट यार्डच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले.
ही स्पर्धा इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या मान्यतेने, बुलडाणा बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या सहकार्याने व छत्रपती तालिम ग्रुप, तेलीपुरा यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तीन प्रमुख प्रकारांचा समावेश करण्यात आला होता, यात शेगाव फिटनेस आयकॉन (फक्त शेगाव शहरातील स्पर्धकांसाठी),महिला फिजिक स्पर्धा (विदर्भस्तर) व शेगाव क्लासिक मेन (विदर्भस्तरीय मुख्य स्पर्धा) चा समावेश होता.
यावेळी स्पर्धेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल, शैलेंद्र पाटील, पांडुरंग बुच, वसुदेव राठोड व श्रीधर पाटील, नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, गजानन जवंजाळ, पवनमहाराज शर्मा, विनोद मसने, बाळू घोरडे, नाना पाटील, डॉ. अविनाश सोळंके आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत हाके यांनी केले.

पुरुष गटात चुरशीच्या लढती
या स्पर्धेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. प्रत्येक खेळाडूने आपल्या मेहनतीचे, फिटनेसचे व सौष्ठवकलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत प्रेक्षकांची दाद मिळवली. या स्पर्धेत योगेश शेंडे (नागपूर) यांनी सर्वोत्तम कामगिरी करत चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन हा मानाचा किताब पटकावला. प्रभावी पोझिंगसाठीचा पुरस्कार गिरिराज काळे (नागपूर) यांना, तर सातत्यपूर्ण प्रगतीसाठीचा पुरस्कार अब्दुल फारुख (वाशिम) यांना देण्यात आला.

अशी आहेत वजनगटानुसार विजेते
०० ते ५५ किलो – अनुप वारके (नागपूर) प्रथम
५५ ते ६० किलो – प्रविण बुथे (वाशिम) प्रथम
६० ते ६५ किलो – गिरिराज काळे (नागपूर) प्रथम

महिलांच्या फिटनेसचे दमदार प्रदर्शन
याचवेळी पार पडलेल्या शेगाव वुमन्स फिजिक स्पर्धेत महिलांनी फिटनेस, ताकद व आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडवले. या स्पर्धेत सपना भरडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या पाठोपाठ सुनिर्धा प्रितम शाह, राजसी राजू लांजेवार, स्वाती तामगाडगे व मिताली विलायतकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.

शेगाव टॉप टेन – २०२६
शेगाव शहरातील स्थानिक स्पर्धकांसाठी आयोजित शेगाव फिटनेस आयकॉन स्पर्धेत धनंजय राऊत यांनी अव्वल स्थान मिळवले. त्यांच्या पाठोपाठ शिवशंकर शेगोकार, मोहम्मद इतिहास, राहुल वाकोडे, आकाश बारगड आदी खेळाडूंनी टॉप टेनमध्ये स्थान मिळवले.

00

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!