बनावट सोने देवून सहकारी बँकेला कोटयावधीचा गंडा!

मनीष अगव्राल, पुणे,

शहरातील एका बहुराज्य सहकारी बँकेच्या दोन शाखांमध्ये तब्बल ९१ लाख रुपयांच्या बनावट सोनेतारण कर्ज घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४१ कर्ज प्रकरणांत तारण ठेवलेले सोने फेरतपासणीत पूर्णपणे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्याने बँक प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी संबंधित कर्जदार आणि तत्कालीन गोल्ड व्हॅल्युएटर अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेची तब्बल ९१ लाखांची फसणूक झाली आहे. गोल्ड व्हॅल्युअर कुलकर्णी मोबाइल बंद ठेऊन, कार्यालयाला व घराला कुलूप लावून पळून गेला आहे. पोलिसांनी सांगितले की, कल्याण जनता सहकारी बँकेचे उप व्यवस्थापक निलेश देशमुख (५०, रा.अमनोरा टॉवर) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती, त्यानूसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात व्हॅल्यूअरसह तब्बल ४२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक दि. २६ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत वारजे आणि बिबवेवाडी शाखांमध्ये झाली आहे. येथून एकूण ४१ ग्राहकांनी सोनेतारण कर्ज घेतले होते. बँकेच्या नोंदीनुसार सर्व ग्राहकांनी बचत खाती उघडून आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. गोल्ड व्हॅल्युएटर अजित कुलकर्णी यांनी दागिन्यांची शुद्धता व वजन तपासून प्रमाणपत्र दिले होते. त्यावर विश्वास ठेवून बँकेने वार्षिक ८.५% व्याजदराने कर्ज मंजूर केले. एकूण ९१ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले. प्रारंभी काही महिन्यांपर्यंत कर्जदारांनी व्याजाची रक्कम भरली. मात्र, त्यानंतर परतफेड थांबली. परिणामी सर्व खाती अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आली.

 

तपासणीत दागिण्यांचे बाजारमूल्य शून्य… कर्जदारांशी संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने आणि गोल्ड व्हॅल्युएटरचा मोबाइल बंद असल्याने बँकेला संशय आला. संबंधित व्हॅल्युएटर त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान दि. ६ व ७ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेने नव्याने नियुक्त गोल्ड व्हॅल्युएटर विवेक एकनाथ डहाळे (प्रथमेश ज्वेलर्स) यांच्या उपस्थितीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आणि पंचांसमक्ष सर्व सिलबंद पाकिटांची सीसीटीव्ही रेकॉर्डिंगसह फेरतपासणी केली असता तारण ठेवलेले सर्व दागिने बनावट होते. त्यांची बाजारमूल्य शून्य असल्याचा अहवाल सादर करण्यात आला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!