बुलडाण्याच्या अल्पवयीन मुलीची नाशिकात हत्या

गळ्यात धारदार चाकू खुपसला; तपासासाठी पोलिसांची विशेष पथक नियुक्त

प्रतिनिधी | बुलडाणा
बुलडाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील  (विजया हिवाळे काल्पनिक नाव) अल्पवयीन मुलीची नाशिक येथे हत्या करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंदखेडराजा येथील एक अल्पवयीन मुलीचे नाशिक येथे शिक्षण घेणाऱ्या युवकावर प्रेम होते. दरम्यान सदर मुलीचे शव नाशिक येथील सारुळ नामक परिसरातील जंगलात आढळून आले. या मुलीच्या गळयात चाकू खुपसलेला असून जवळपास पिझाचे तुकडे पोलीसांना आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळताच वाडीवरे पोलीस स्टेशन येथील पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपासावरुन दोन युवकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा राग येचून हत्या

दरम्यान मृतक मुलगी ही इतर मुलांशी बोलत होती, या गोष्टीचा राग प्रियकर अर्थव देशमुख याला आला. त्याने तिला या संदर्भात बजावले होते, परंतू तीने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने मित्रासोबत मिळून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

बुलडाणा – नाशिक प्रवाहातच अल्पवयीन युवतीची हत्या
बुलडाणा येथून सदर युवती निघाली होती, तेव्हा तिच्यासोबत तिचा प्रियकर होता. सदर प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने सदर अल्पवयीन मुलीचा खून केला व पुराव्याची विल्हेवाट लावण्यासाठी सदर मृतदेह नाशिक परिसरातील जंगला फेकला अशी माहिती नाशिक पोलिसाकडून मिळाली आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!